मुंबई: झोमॅटो कंपनीणे आता घरोपच दारू डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दारूच्या दुकानासमोरील गर्दी कमी होईल. लॉकडाऊन काळात दारुची मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे झोमॅटोने स्पष्ट केले आहे.
झोमॅटोचे सीईओ मोहित गुप्ता म्हणाले, टेक्नॉलॉजीच्या मदतीने दारुची डिलिव्हरी केली जाऊ शकते. तर दारु विक्री चांगल्या प्रकारे होऊ शकते. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी आहेत अशा ठिकाणी आम्ही दारु घरपोच देण्याचा विचार करत आहे.
सध्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरु असून सरकारने दारूची दुकाने उघडण्यास सूट दिली आहे. मात्र लोकांनी दारू विकत घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दुकाने पुन्हा बंद देखील करावी लागली. या संधीचा फायदा घेत झोमॅटो कंपनीणे आता घरोपच दारू डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दारुच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे राज्य सरकारने फायदा घेत दारुवर 70 टक्के विशेष कोरोना टॅक्स लावला आहे.
(आयएसडब्लूएआय) इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसीएशन ऑफ इंडिया कार्यकारी अध्यक्ष अमृत सिंह यांनी राज्याला घरोघरी दारु पोच करण्यास परवानगी द्यावी. जेणेकरुन लॉकडाऊनमध्ये राज्यातील महसूल वाढेल, असे मत व्यक्त केले आहे.