Zoji-la Tunnel: जम्मू-काश्मीरच्या झोजिला बोगद्यात भारताने रचला इतिहास ; शेवटचा ब्रेकथ्रू पूर्ण
Zoji-la Tunnel: जम्मू आणि काश्मीरला लडाखशी जोडणाऱ्या झोजिला बोगद्याचे अंतिम काम आज पूर्ण झाले.

Zoji-la Tunnel: जम्मू आणि काश्मीरला लडाखशी जोडणाऱ्या झोजिला (Zoji-la Tunnel ) बोगद्याचे अंतिम काम आज पूर्ण झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
या कामगिरीमुळे, काश्मीर आणि लडाख दरम्यान बारमाही रस्ता असण्याचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या जवळ आले आहे. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आपला आनंद व्यक्त केला. गडकरी यांनीही या बोगद्याचे महत्त्व अधोरेखित केले.
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी यावेळी, “आज मंत्र्यांनी (नितीन गडकरी) लडाखच्या लोकांना बारमाही कनेक्टिव्हिटी देण्याचा अंतिम टप्पा पूर्ण केला आहे, हा एक ऐतिहासिक दिवस आहे. मी लडाख आणि जम्मू आणि काश्मीरच्या लोकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.” असे म्हटले.
मनोज सिन्हा यांनी अभियंत्यांचे अभिनंदन केले (Zoji-la Tunnel)
सिन्हा यांनी बोगद्याच्या बांधकामात सहभागी असलेल्या मनुष्यबळाची प्रशंसा केली आणि पुढे म्हणाले, “मी या प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्व अभियंत्यांचे अभिनंदन करतो, ज्यांनी इतक्या उंचीवर कठीण परिस्थितीत काम केले आहे.” आपल्याला सर्वांना माहीत आहे की, कनेक्टिव्हिटीमुळे विकासाला चालना मिळते. गेल्या १२ वर्षांत या भागात बरेच काम झाले आहे.
बोगदा जगाच्या इतिहासातही प्रथम क्रमांकावर येईल – गडकरी (Zoji-la Tunnel)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महत्त्वपूर्ण कामगिरीचे वर्णन भारतीय अभियांत्रिकीच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय असे केले. ते म्हणाले, “आज भारतीय पायाभूत सुविधांच्या इतिहासात एक सुवर्ण दिवस आहे. हा बोगदा १४ किलोमीटर लांब आणि अत्याधुनिक आहे. मला नुकतेच सांगण्यात आले की, आतापर्यंत आपण याला आशियातील सर्वात लांब बोगदा म्हणत होतो. पण मला हे जाणून खूप आनंद झाला आहे की, तो जगाच्या इतिहासातही प्रथम क्रमांकावर येईल. ही लेह आणि लडाखच्या लोकांसाठी जीवनरेखा आहे.”
केंद्रीय मंत्र्यांनी बोगद्याच्या बांधकामादरम्यान आलेल्या नैसर्गिक आव्हानांची आणि टीमच्या कठोर परिश्रमांची प्रशंसा केली. ते म्हणाले, “येथील उंची अंदाजे ३,००० मीटर आहे. जेव्हा काम सुरू होते, तेव्हा येथील तापमान -४ अंश सेल्सिअस किंवा त्याहूनही कमी होते.” आमचे अभियंते, मजूर, कंत्राटदार आणि डॉक्टरांनी अशा अत्यंत थंडीत खूप मेहनत घेतली आहे. गडकरी यांनी सांगितले की, हा बोगदा जागतिक दर्जाच्या सुरक्षा मानकांनुसार बांधण्यात आला आहे आणि तो लडाख व लेह दरम्यान सर्व-हवामान संपर्क प्रदान करेल. असे त्यांनी यावेळी म्हटले.
झोजिला बोगद्याचे महत्त्व (Zoji-la Tunnel)
Zoji-la Tunnel: जम्मू-काश्मीरच्या झोजिला बोगद्यात भारताने रचला इतिहास ; शेवटचा ब्रेकथ्रू पूर्ण
या अंतिम ब्रेकथ्रूमुळे, पर्वताची दोन्ही टोके आता पूर्णपणे जोडली गेली आहेत. आता, बोगद्याच्या आत रस्ते बांधकाम, प्रकाशयोजना, सीसीटीव्ही कॅमेरे आणि आधुनिक सुरक्षा प्रणालींची कामे वेगाने पूर्ण केली जाऊ शकतात. हा बोगदा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यामुळे, लडाखचा उर्वरित देशापासूनचा हिवाळी संपर्क कायमचा तुटेल.





