जिंतीमध्ये अवैध धंदे जोमात

साखरवाडी पोलिसांचे दुर्लक्ष : ग्रामस्थ भेटणार एसपींना

दुधेबावी – साखरवाडी पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाच्या कृपेने दुष्काळातही फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिंती, विविध ठिकाणी खुलेआम मटका, जुगार, दारूसारखे अवैधधंदे चांगलेच फोफावत चालले असून या धंद्याच्या नादी लागून व्यावसायिकांसह पोलीस मालामाल तर गरीब कुटुंबे हवालदिल होऊ लागले आहेत. याबाबत अनेक वेळा ग्रामस्थांनी आवाज उठवून देखिल अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.

याबाबत जिंती येथे मागणी तीन वर्षांपूर्वी ग्रामसभेत ठराव एक मताने मंजूर केला आहे. तरीही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. परंतु दुसऱ्यांदा 26 जानेवारीच्या ग्रामसभेत युवकांनी अवैधधंद्याचा मुद्दा उचलून धरला होता. बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांचे अवैध धंदे सुरू असल्याने गावाचे नाव धुळीस मिळत असल्याने हे व्यवसाय बंद होण्यासाठी आवाज उठवत युवकांनी संताप व्यक्त केला आहे. मटका, जुगाराच्या नादी लागून पैशांच्या हव्यासापोटी अनेक मोलमजुरी करणारे घरे मटक्‍याच्या नादिला लागून वृध्दासह, बायका, तरुण, मटक्‍याच्या अड्ड्यावर जाऊन पैसा घालवून मेटाकुटीला आल्याने घरावर आर्थिक बोजा होऊन दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे.

आर्थिक व्यवहार सुरळीतपणे सुरू असल्याने अवैध धंद्यावर पोलिसांचा कसलाच वचक राहिला नसल्याने दिसून येते आहे. जिंती-खुंटे रस्त्याच्या कडेला चटई मांडून खुलेआम मटक्‍याची बुकी घेतली जात आहेत. यामुळे फलटण तालुक्‍यातील पोलीस यंत्रणा करते तरी काय? असा प्रश्‍न निर्माण होऊ लागला आहे. अवैधधंदे वाल्यांच्या आर्थिक संबंधामुळे पोलिसांकडून फक्त पोकळ कारवाया केल्या जात असतात, एकीकडे कारवाई करताच संध्याकाळपर्यंत आर्थिक तडजोड करून पुन्हा नव्या जोमाने हे धंदे सुरू होत असतात. फलटण तालुक्‍यासह जिंती, साखरवाडी येथे सध्या खुलेआम दारू, मटका, जुगार व्यवसाय सुरू व निरा नदीच्या काठी मटक्‍याच्या मोठ्या प्रमाणात धंदा सुरू आहे. असून यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते.

Leave A Reply

Your email address will not be published.