झिम्बाब्वेचा पाकवर सुपर विजय

रावळपिंडी – एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दुबळ्या झिम्बाब्वेने यजमान पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करत धक्‍कादायक निकालाची नोंद केली.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बावेने सिन विल्यम्सच्या शतकाच्या जोरावर 6 बाद 278 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बाबर आझमच्या शतकी खेळीनंतरही पाकिस्तानला 9 बाद 278 धावांवर रोखत झिम्बाब्वेने अफलातून कामगिरी केली.

त्यानंतर निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यात ब्लेसिंग्ज मुझारबानीने सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना बाद केले. पाकिस्तानला केवळ 2 धावाच करता आल्या.

विजयासाठी आवश्‍यक 3 धावा सहज फटकावत झिम्बाब्वेनने हा सामना जिंकला. अर्थात, या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून पाकिस्तानने मालिका विजय मिळवला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.