उत्तरेतील अधिकारी दक्षिणेत, तर दक्षिणेचा असणार उत्तरेत
नगर – जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक आलेख उंचाविण्यासाठी शाळा भेटीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये उत्तरेतील दक्षिणेत व दक्षिणेतील उत्तरेत अधिकारी पठावून त्यांच्या माध्यमातून शाळांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक आले ख उंचाविण्यासाठी उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी विशेष उपक्रम हाती घेतलेला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांची अचानक भेट देऊन तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये स्वतः उपाध्यक्ष प्रताप शेळके काही शाळांना भेटी देणार आहेत. त्याचबरोबर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात येणार आहेत.
मात्र ही पथके तयार करताना उत्तरेतील अधिकारी दक्षिणेत व दक्षिणतेली अधिकारी उत्तरेत पाठवून त्यांच्याकडून शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. हा उपक्रम शाळांची गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करण्यात येणार असून त्रुटी आढळलेल्यांना त्यात सुधारणा करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. हा उपक्रम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.