‘अमिक्रॉन’बाबत केंदीय आरोग्यमंत्र्यांनी दिली दिलासादायक माहिती…

नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या करोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे अवघ्या जगाचं टेन्शन वाढलं आहे. विषाणूच्या या नव्या प्रकाराचे नामकरण ‘अमिक्रॉन’ असे करण्यात आले असून तो आधीच्या विषाणूंपेक्षा अधिक घातक ठरू शकतो असे तज्ज्ञ सांगतायेत. प्रथम दक्षिण आफ्रिकेत सापडलेला विषाणूचा हा नवा प्रकार आता नेदरलँड, बोत्सवाना, यूके, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, इस्रायल, बेल्जियम, चेक प्रजासत्ताक, इटली, जर्मनी आणि हाँगकाँग या देशांमध्ये पसरला आहे. ‘अमिक्रॉन’मुळे भारत सरकार देखील अलर्ट झाले असून आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज संसदेत बोलताना देशातील करोना विषाणूच्या ‘अमिक्रॉन’ प्रकाराबाबत माहिती दिली. देशात सद्यस्थितीला ‘अमिक्रॉन’ची बाधा झालेला एकही रुग्ण आढळून आला नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच यापुढे देशात अमिक्रॉन बाधित रुग्ण प्रवेश करूच नये यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं मांडवीय म्हणाले.

संदेमध्ये बोलताना मांडवीय यांनी स्पष्ट केलं की, ‘करोना परिस्थिती जरी आटोक्यात आली असली तरी हा विषाणू पूर्णपणे गेलेला नाही.’

दरम्यान, देशात आतापर्यंत १२४ कोटी लस मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरण मोहीम अद्याप सुरु आहे. अशातच आता करोना विषाणूचा ‘अमिक्रॉन’ प्रकार समोर आल्याने सर्व जगाची चिंता वाढली आहे. विषाणूच्या उत्परिवर्तित अमिक्रॉन विषाणूमध्ये मूळ करोना विषाणूपेक्षा ५० बदल असल्याचे आढळून आले आहे. पैकी ३० बदल हे स्पाईक प्रोटीनसंबंधित असल्याचे आढळून आल्याचं तज्ज्ञांनी सांगितल आहे.

बहुतांश करोनाप्रतिबंधक लसी या स्पाईक प्रोटीन आधारित असल्याने उत्परिवर्तित अमिक्रॉनवर त्या प्रभावी ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.