पुणे : ऍटोससिंटेल, झेन्सर संघांनी प्रथम स्पोर्टस आयोजित आयटी टी-20 क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.ऍटोसिंटेल संघाने 8 बाद 177 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना बार्कलेजचा डाव 19.3 षटकांत 155 धावांत आटोपला. दुसऱ्या लढतीत झेन्सर संघाने बीएनवाय मेलन संघावर 5 गडी राखून मात केली.
मेलन संघाने 3 बाद 156 धावा केल्या. झेन्सर संघाने विजयी लक्ष्य 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. कॉग्निझंट संघाने सीबीएसएल संघावर सहा गडी राखून मात केली.