ZEE5 PREMIUMच्या वार्षिक सब्सक्रिप्शन प्लॅनवर आता 50 टक्केची ‘सूट’; जाणून घ्या काय आहे ‘ऑफर’….

ZEE5 PREMIUM OFFER –  झी प्रिमियरच्या वार्षिक सब्सक्रिप्शन प्लॅनवर आता 50 टक्के सूट दिली जात आहे. कंपनीकडून ही ऑफर (OTT) प्लॅटफॉर्मच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त सादर करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना फक्त 499 रुपयात एका वर्षाचे सब्सक्रिप्शन मिळवता येणार आहे. परंतु त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की, ही ऑफर फक्त या महिन्याच्या 28 तारखेपर्यंत मर्यादीत आहे. त्यानंतर प्रीमियम वार्षिक सब्सक्रिप्शनची किंमत 999 रुपये असणार आहे.

या व्यतिरिक्त ZEE5 PREMIUMच्या एक आणि तीन महिन्याच्या प्लॅनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही ऑफर फक्त वार्षिक सब्सक्रिप्शन प्लॉनवर देण्यात आली आहे.
आता ZEE5 PREMIUM चे ग्राहक वार्षिक सब्सक्रिप्शनचा प्लॉन 499 रुपयात मिळवू शकतात.

याच्या तुलनेत नेहमीच्या प्लॅनची किंमत 999 रुपये आहे. यंदा ZEE5 ही कंपनी आपला तिसरा वाढदिवस साजरा करत आहे. हे औचित्य साधून त्यांनी ही ऑफर सादर केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी या ऑफरचा लाभ 28 फेब्रुवारीच्या अगोदर जरुर घ्यावा.

ZEE5 PREMIUMच्या एका महिन्याच्या सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत 99 रुपये आहे. तसेच तीन महिन्याच्या सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. ZEE5 PREMIUM ही कंपनी आपल्या सदस्यांना सर्व ZEE5 ओरीजनल आणि एक्सक्ल्यूसिव्ह कंटेट सोबत ब्लॉकबस्टर सिनेमे, सर्व ALT Balaji शो, Zindagi TV चे शो, Kids, Live TV आणि TV शोचा एक्सेस टेलिकास्टच्या पहिले प्राप्त होतात. ZEE5 प्रीमियमचे सदस्य एकावेळी 5 डिव्हाइसवर कंटेट पाहू शकता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.