झी मराठी अवॉर्ड्स 2019 मध्ये ‘या’ मालिकेने मारली बाजी

मुंबई – झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा खऱ्याअर्थाने गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड्स’. दरवर्षी हा सोहळा अतिशय थाटामाटात आणि दिमाखमात पार पडतो. यंदाही ‘झी मराठी अवॉर्ड्स 2019’ हा सोहळा त्याच दिमाखदार पद्धतीने पार पडला आहे. या वर्षीच्या सोहळ्यात ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली असून, पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकांना टक्कर देत ‘अग्गंबाई सासूबाई’ने स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून या मालिकेचं जोरदार कौतुक होत आहे.

त्यामुळे ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेने सर्वोत्कृष्ट सासू, सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (स्त्री), सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट आई असे एकूण नऊ पुरस्कार या मालिकेने पटकावले आहेत.

या मालिकेमध्ये गिरीश ओक, निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की हे दिग्ज कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.