झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसची प्रवर्तक कंपनी असणारी एस्सेल ग्रुप ही झी एंटरटेनमेंट कंपनीतील आपला 16.5 हिस्सा विकणार, या बातमीमुळं मागील आठवड्यात झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसचा शेअर 24 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला.
या विक्रीनंतर एस्सेल कंपनीचा हिस्सा 5 टक्क्यांवर येणार असून या हिस्सा विक्रीनंतर येणारा पैसा हा समूहाचं कर्ज दायित्व कमी करण्यासाठी वापरण्यात येईल असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. या 16.5 टक्क्यांपैकी 2.3 टक्के हिस्सा हा झी समूहातील सर्वांत जुन्या गुंतवणूकदारांपैकी एक असणाऱ्या इन्व्हेस्को फंडाची उपकंपनी असणारी ओएफआय ग्लोबल चायना फंड खरेदी करत आहे, ज्यांच्याकडं सध्या झी मधील 8.7 टक्के हिस्सा आहेच.
या हिस्सा विक्रीमधून साधारणपणे 70% कर्जाचा भार कमी होऊन त्यावरील व्याजापोटी होणारा खर्च वाचवला जाऊ शकतो, त्यामुळं कंपनीवरील कर्जं कमी करण्याच्या दृष्टीनं हिस्सा विक्री ही मोठी पायरी ठरू शकत असल्यानं गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्सची खरेदी केली.
उरलेली कर्जं उतरवण्याच्या दृष्टीनं कंपनीची माध्यमे तर मालमत्ता विक्री हा पर्याय असू शकतो. जवळ-जवळ साडेसहा वर्षानंतर, मागील महिन्याच्या 1 तारखेस कंपनीच्या शेअर्सचा भाव 199.15 वर आला होता.