संपूर्ण जगामध्ये नॉवेल कोरोना जागतिक साथ जाहीर केल्यानंतर युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु आहेत.याचाच एक भाग म्हणून शाळा,अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच तंत्रनिकेतन संस्थांतील अध्यापनास शासन निर्देशानुसार सुट्टी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीला अनुसरून झील एजुकेशन सोसायटी पुणे तर्फे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी “लर्न फ्रॉम होम” संकल्पना प्रभावीपणे राबवतेय आहे.यासाठी संस्था स्तरावर विशिष्ठ नियोजन करण्यात आले आहे.प्रत्येक वर्गासाठी स्वत्रंत “गूगल कलासरूम” ह्या व्हर्चुअल कलासरूम तयार करण्यात आले आहे.
या मार्फत प्रत्येक विषयावर आधारित प्राध्यापकानी बनवलेल्या चित्रफिती,माहिती देणारी प्रेसेंटेशन्स तसेच स्टडी मटेरियल गूगल कलासरूम द्वारेच पुरविण्यात येत आहे. तसेच या गूगल क्लासरूमचा वापर करून विद्यार्थी त्याना देण्यात येणाऱ्या असायनमेंट्स सुद्धा ते सोडवत आहेत व प्राध्यापकही मूल्यमापन करतायेत.
झील संस्थेतील महाविद्यालय ही सावित्रीबाई फुले विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्याशी संलग्नित असल्यामुळे प्राध्यापकांनी बनवलेल्या चित्रफिती तंतोतंत अभ्यासक्रमावर आधारित आहेत. त्यामुळे हा उपक्रम झील एजुकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या सगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बंधनकारक केला आहे. आता पर्यंत ३००० विद्यार्थी या उपक्रमाशी जोडले गेले आहेत व ह्या उपक्रमास झील ने “स्टुडन्ट कनेक्ट प्रोग्राम” असे नाव दिले आहे.
या उपक्रमाचे पालकांमार्फत स्वागत होत आहे असून विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे..
पुढील काळात होऊ घातलेल्या परीक्षांमध्ये जर विद्यार्थ्यानी मिळालेल्या या रिकाम्या वेळेचा सदुपयोग केल्यास नकीच हा उपक्रम शैक्षणिक गुणवत्ता वाढवेल असा विश्वास संस्थेचे सचिव जयेश काटकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच या काळात विद्यार्थ्यानी शैक्षणिक नुकसान टाळत चांगले गुण मिळवण्यासाठी स्टुडन्ट कनेक्ट प्रोग्रामचा उपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
पालकांची प्रतिक्रिया :
झील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड रिसर्च मध्ये माझी मुलगी आय टी विभागात तृतीय वर्षात शिकत आहे. सध्या या परिस्थिती मध्ये गुगल क्लासरूम चा उपयोग करून कॉलेजने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळलं आहे असं मला वाटतं.
– वैशाली अनिल कांबळे.
विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया :
मी झील तंत्रनिकेतनच्या कॉम्पुटर विभागात दुसऱ्या वर्षात शिकत आहे. गुगल क्लासरूम हे फोन आणि लॅपटॉप यावर वापरता येते, ही खूप जमेची बाजू आहे. यातून मी आता शिक्षकांनी बनवलेले व्हिडिओस बघू शकते, तसेच असायनमेंट्स सोडवू शकते.
-वृषाली वले.