झाकीर नाईकमुळे मलेशिया सरकार हैराण

भडकाऊ भाषणांची करणार चौकशी

क्वालालम्पुर – वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक गेल्या तीन वर्षांपासून मलेशियात राहतो आहे. मात्र, तेथेही तो आपले भडकाऊ आणि वादग्रस्त वक्तव्ये करताना दिसून येतो आहे. त्यामुळे त्याच्या या भडकाऊ वक्तव्यांची आता मलेशिया सरकार चौकशी करणार आहे. यासाठी त्याला समन्स देखील बजावण्यात येणार असल्याचे मलेशिया सरकारने म्हटले आहे.

गेल्या तीन वर्षापासून मलेशियात रहात असलेल्या झाकीर नाईक याच्या धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या भाषणांमुळे मलेशिया सरकार नाराज आहे. याप्रकरणी पोलिस नाईक आणि अन्य काही लोकांची चौकशी करणार आहे. धार्मिक भावना भडकावण्यासाठी खोटा प्रचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, असे मलेशियाचे गृहमंत्री मुहिद्दीन यासिन यांनी सांगितले.

मलेशियामधील हिंदूंना भारतातील मुस्लीम अल्पसंख्याकांपेक्षा 100 पट जास्त हक्क आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य नाईक यांनी केले होते. या त्याच्या वक्तव्याची मलेशिया सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मलेशिया दंड संहितेच्या कलम 504 अतंर्गत कोणत्याही समुदायाला कमी लेखल्यास कारवाईची तरतूद आहे. त्यानुसार झाकीर नाईक याच्यावर कारवाई होण्याची शक्‍यता आहे.

झाकीर नाईक याला भारताच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी मलेशियाचे मानव संसाधन विकासमंत्री एम. कुलसेगरन यांनी याआधीच केली आहे. झाकीर तीन वर्षांपासून मलेशियात राहत असून, मनी लॉंड्रिंग आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×