पोटनिवडणुकीत जाकिया शेख विजयी  

जामखेड  – शहराच्या बहुचर्चित नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जाकीया आयुब शेख 44 मतांनी विजयी झाल्या. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासाठी ही पोटनिवडणूक मोठी प्रतिष्ठेची झाली होती.
जामखेड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 च्या नगरसेविका व उपनगराध्यक्षा फरिदाखान पठाण यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी रविवारी मतदान झाले होते. 78.2 टक्के मतदान झाले.

या निवडणुकीत भाजपच्या जाकीय शेख, कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतर्फे परवीन सिरोजोद्दीन शेख तर अपक्ष रोहिणी संजय काशिद व मैनाबाई ज्ञानदेव सदाफुले अशी चौरंगी लढत झाली. पालकमंत्र्यांनी या जागेसाठी प्रतिष्ठापणाला लावली होती. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या पोटनिवडणुकीची मतमोजणी जामखेड येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णायक अधिकारी तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत झाली.

या मतमोजणीमध्ये भाजपच्या उमेदवार जाकीया शेख यांना 449 मते, आघाडीच्या परवीन शेख यांना 202 मते, रोहिणी काशिद 405 मते (अपक्ष), मैनाबाई सदाफुले यांना 56 मते (अपक्ष), छाया गुंदेचा 2 मते (अपक्ष) नोटाला 3 मते पडली. जाकीया शेख 44 मतांनी विजयी झाल्या. त्याच्या निवडीबद्दल भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, नगराध्यक्ष निखिल घायतडक, नगरसेवक अमित चिंतामणी, हाजी अजहभाई काझी, हाजी कलीमुल्ला कुरेशी, हाजी मुख्तार सय्यद, ईस्माईल सय्यद, गफ्फारभाई सय्यद यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Leave A Reply

Your email address will not be published.