झायरा वसिमने बॉलिवूडमध्ये काम सुरूच ठेवले

“दंगल’ गर्ल झायरा वसिमने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. “द स्काय इज पिंक’चा वर्ल्ड प्रिमियर टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार आहे.

यातील लीड ऍक्‍ट्रेस प्रियंका चोप्राने या फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहताना या सिनेमातील कलाकारांबरोबरचा फोटोही सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यामध्ये झायरा वसिमला बघितल्यावर नेटिझन्सनी झायराला ट्रोल करायला सुरुवात केली.

आपल्याला धर्माबरोबरची बांधिलकी जपायची आहे. आपल्या धर्मामध्ये एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची परवानगी नाही, असे झायरा पूर्वी म्हणाली होती. त्याची आठवण नेटिझन्सनी करून दिली. “या फोटोमुळे तुझ्या धार्मिक भावना दुखावत नाहीत का?’ असा प्रश्‍नही काही नेटिझन्सनी विचारला आणि “तू नुसते नाटक करते आहेस.’ अशी टीका केली.

झायराला अनेकांनी इंटरनेटवर चांगलेच ट्रोल केले. तिला ड्रामेबाज, नौटंकी, असे संबोधले गेले.केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिने बॉलिवूड सोडण्याचे नाटक केले होते, असे बहुतेकांनी म्हटले आहे.

प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा आणि रोहित सराफ या सहकलाकारांबरोबर झायरा वसिम खिदळताना दिसते आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×