पंधराव्या वर्षीच कुराण केले तोंडपाठ: कुराणे हाफिज पदवी प्रमाणित
सातारा – संपूर्ण देशभरात उत्सवात ईद साजरी होत असताना छ.शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक राजधानीमध्ये झहीर युसुफ शेख या पंधरा वर्षीय तरुणाने संपूर्ण कुराण पाठ केल्याने या तरुणाला अतिशय कमी वयामध्ये कुराणे हाफिज हि पदवी प्रमाणित करण्यात आल्याने झहीर शेख या तरुणाचा भारतीय जनता पार्टी सातारा शहराच्या वतीने शहराध्यक्ष सुनिल काळेकर यांच्या हस्ते झहीर शेख याला संपुर्ण पोशाख चॉंद ची प्रतिमा व सातारी कंदी पेठे देवून विशेष सत्कार करण्यात आला. व सर्व मुस्लिम बांधवांना मिठाईचे वाटप करुन पुष्प गुच्छ भेट देवुन शुभेच्छा देण्यात आल्या.
शहराध्यक्ष सुनिल काळेकर म्हणाल, झहीर युसुफ शेख या तरुणाने कमी वयात केलेल्या या कामगिरीने समाजात प्रेरणा निर्माण झाली आहे. अशीच प्रेरणा घेवून प्रत्येक तरुणाने विविध क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविले पाहिजे. यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे, अल्पसंख्यांक मोर्चा शहर अध्यक्ष सादिक पैलवान, शहर उपाध्यक्ष निलेश कदम, निलेश शहा ,सातारा विधानसभा प्रमुख सुनिषा शहा, महिला मोर्चा शहरउपाध्यक्षा जयश्री काळेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष धीरज घाडगे, व्यापारी आघाडीचे लक्ष्मण पटेल, डॉ. दर्ब आदी पदाधिकारी व कार्यकर्तानी झहीर शेखच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पोवई नाका मशिदीचे मौलाना रियाज कुरेशी, अस्लम शेख, युसुफ बागवान, मोहसिन शिकलगार, इरफान शिकलगार, हाफिज निसार यांनी भाजपाच्या या उपक्रमाचे कौतुक व स्वागत केले.