नवी दिल्ली – करोना विषाणूंचा धसका आता भारतीय क्रिकेट संघानेही घेतला असल्याचे स्पष्ट होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून (गुरुवार) सुरू होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ धर्मशाला येथे विमानाने दाखल झाला. या प्रवासात संघातील खेळाडू यजुर्वेंद्र चहल याने मास्क लावलेला फोटो शेअर केला असून खेळाडूंनीच नव्हे तर सर्वांनीच काळजी घ्यावी असे आवाहनही केले आहे.
? ? ✈️✈️ pic.twitter.com/BnCyJCuf4V
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) March 10, 2020
करोना विषाणू संसर्गाने जगभरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूंचा प्रसार वेगाने होत असला तरीही घाबरून जाण्याचे कारण नाही, नागरिकांनी योग्य ती दक्षता घेतली तर आपण या संकटाचा निश्चितच सामना करू शकतो असेही चहलने सांगितले आहे.
क्रीडा क्षेत्रावर या विषाणूंचा परिणाम झाला असून जगभरातील अनेक स्पर्धा एकतर पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा रद्दही करण्यात आल्या आहेत.