#CWC19 : भारतीय संघात एक बदल, ‘या’ फिरकीपटूचा संघात पुन्हा समावेश

लंडन : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये रंगणार आहे. साखळी फेरीत भारतानं किवींपेक्षा चांगली कामगिरी केली असून या सामन्यात भारताचं पारड जड आहे. आतापर्यंत विश्वचषकामध्ये दोन्ही संघांमध्ये 8 मुकाबले झाले असून भारतानं 3 तर न्यूझीलंडनं 4 सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत-न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्यास काहीच वेळात सुरूवात होणार असून न्यूझीलंडचा कर्णधार याने टाॅस जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली आहे.

आजचा सामना जिंकून दोन्ही संघाचे अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे ध्येय असणार आहे. त्यासाठी अंतिम संघाची निवड महत्वाची ठरणार आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरूध्दच्या विजयी संघ कायम न ठेवता एक बदल केला आहे. कुलदीप यादव ऐवजी संघात युझवेंद्र चहलचा समावेश करण्यात आला आहे. तर रवींद्र जडेजा संघात कायम आहे.

दुसरीकडे न्यूझीलंडच्या चाहत्यासाठी खुशखबर आहे. दुखापतीमुळे लॉकी फर्ग्युसन खेळणार की नाही अशी साशंकता व्यक्त करण्यात येत होती मात्र तो तंदुरस्त असून आजच्या सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंड संघ – मार्टिन गप्टिल, हेनरी निकोल्स, केन विलियमसन, रॉस टेलर, टॉम लाथम, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिचेल सैंटनर, मैट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट

भारतीय संघ – रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युज़वेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

दरम्यान, पावसामुळे जर खेळ झाला नाही तर बुधवारचा दिवस त्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. बुधवारीही खेळ झाला नाही तर भारत व न्यूझीलंड यांनी साखळी गटात केलेल्या कामगिरीचा निकष लावला जाईल. या गटात भारताने 15 गुण घेत आघाडीस्थान घेतले आहे. न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्यास्थानावर आहे. साहजिकचे गुणांच्या आधारे भारतास अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.