खाशोगीवर गोळी मारण्याची सौदी युवराजाची सूचना होती ; युवराजच्या सहकाऱ्याची माहिती

वॉशिंग्टन: पत्रकार जमाल खाशोगीला गोळी घालण्याची सूचना सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी आपल्या सहकाऱ्याला वर्षभरापूर्वीच केली होती. अमेरिकेतील एका वर्तमानपत्राने अमेरिकेच्याच गुप्तचर विभागाच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. युवराज मोहंम्मद बिन सलमान यांनी वर्षभरापूर्वीच खाशोगी यांना मारण्याची तयारी केली होती. मात्र त्यांनी स्वतःच गोळी मारली नाही, असेही या वृत्तामध्ये म्हटले आहे.

खाशोगी बेपत्ता झाल्यानंतर त्याबाबत आपल्याला काहीही माहितीच नाही, अशी भूमिका सौदीच्या राजघराण्याने घेतली होती. मात्र तपासानंतर खाशोगी यांचा मृत्यू इस्तंबुलमधील सौदीच्या दूतावासामध्येच झाल्याचेही राजघराण्याने मान्य केले होते. मात्र या हत्येमध्ये युवराजांचा थेट हात असल्याचा आरोप सातत्याने फेटाळला गेला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने राष्ट्रीय सुरक्षा संस्था आणि अन्य सहकारी संस्थांच्या मदतीने काही आंतरराष्ट्रीय नेत्यांचे संभाषण पकडले होते. त्यात अगदी अलिकडेच पकडलेल्या संभाषणांमध्ये युवराज मोहंम्मद बिन सलमान यांचा खाशोगी हत्येशी थेट संबंध असल्याचे पुरावेच समोर आले आहेत. खाशोगी यांची हत्या 2 ऑक्‍टोबर 2018 रोजी झाली होती. खाशोगी यांच्या हत्येपूर्वीच 13 महिने म्हणजे सप्टेंबर 2017 मध्ये युवराज मोहंमद बिन सलमान आणि त्यांचा सहकारी तुर्की अल्दाखिल यांच्यात हे संभाषण झाले होते.

खाशोगी सौदी अरेबियाला परतणार नाहीत. त्यामुळे त्यांना बळजबरीने परत आणले जायला हवे. जर कोणत्याही पद्धतीने त्यांना परत आणणे शक्‍य झाले नाही, तर बंदुकीच्या गोळीसह त्यांच्याकडे जावे लागेल, अशी सूचना युवराजांनी त्यांच्या सहकाऱ्याला केली होती. युवराजांच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्या खाशोगी यांच्या हत्येस कारणीभूत असल्याबद्दल सौदी राजघराण्यावर मोठी टीका व्हायला लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)