टोरांटो – युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असलातरी त्याची बॅट क्रिकेटमधून निवृत्त झालेली नाही हे युवराजने ग्लोबल टी 20 लीगमध्ये दाखवून दिले आहे. एकापाठोपाठ एक स्फोटक खेळी करून तो चाहत्यांचे लक्ष पुन्हा वेधून घेत आहे.
युवराज टोरांटो नॅशनल्सचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला आहे. ब्रॅम्पटन व्हॉल्वस विरुद्धच्या समान्यात युवराजची बॅट पुन्हा तळपलेली दिसली. युवराजने या सामन्यात 22 चेंडूंमध्ये 51 धावा केल्या. मात्र, तो त्याच्या संघाचा पराभव टाळू शकला नाही. युवराजच्या वेगवान खेळीनंतरही टोरांटो नॅशनल्सला विजयासाठी 11 रन्स कमी पडल्या.
युवराज या सिझनमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने टोरांटो नॅशनल्ससाठी कर्णधार म्हणून खेळताना काही उपयुक्त खेळी केल्या आहेत. या सिझनमध्ये युवराजने ब्रॅम्पटन व्हॉल्वस संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला असून, धडाकेबाज अर्धशतक झळकावले.