नवी दिल्ली – भारताचा सिक्सरकिंग युवराज सिंग याने आपण लवकरच मैदानात परतणार असल्याचे सांगत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. कोणत्या स्पर्धेत तो सहभागी होणार आहे ते त्याने स्पष्ट केले नसले तरीही पुढील वर्षी फेब्रुवारीत आपण खेळताना दिसणार असेही त्याने सांगितले आहे.
युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर परदेशात होत असलेल्या विविध टी-20 लीग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, चाहत्यांच्या विनंतीला मान देत पुन्हा एकदा आपण क्रिकेटपटू म्हणून मैदानात उतरण्याचा विचार करत होतो व अखेर तोच निर्णय घेतला, असेही युवराज म्हणाला.