नवी दिल्ली : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. युवराज सिंग आपली पत्नी आणि भाऊ जोरावरसिंगसमवेत एका वेब सीरिजमध्ये काम करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या सर्व बातम्यांचे युवराज सिंग यांनी खंडन केले आहे.
त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून याची माहिती दिली. या सर्व बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे सांगत युवराज सिंग यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. युवराजने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मला काही गोष्टी योग्य दृष्टीकोनातून सांगायच्या आहेत. मला नुकतीच एक बातमी मिळाली आहे की, मी एका वेब सीरीजद्वारे पदार्पण करणार आहे; हि बातमी चुकीचे आहे.’
Just to put some things in to correct perspective with regards to the recent news on me making a debut into webseries is factually incorrect, the web series features my younger brother and not me. Request all my friends in media to take corrective measures on the same. ThankYou🙏
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) February 19, 2020
‘मला नाही तर माझ्या भावाला वेब सीरिजमध्ये घेण्यात आले आहे. मी माध्यमातील सर्व मित्रांना विनंती करतो कि या बातमीत सुधार करण्यात यावा. धन्यवाद वेब सीरिजमध्ये युवराजच्या पदार्पणाची बातम्या व्हयरल झल्यामुळे युवराज यांनी या बातम्यांचे खंडन केले आह.