नवी दिल्ली :देशासमोर उभ्या असलेल्या करोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार आणि आजी-माजी खेळाडू पुढे सरसावले आहेत. क्रिकेट खेळाडूपैकी हरभजन सिंग, शिखर धवन, रोहित शर्मा, गौतम गंभीर, सचिन तेंडूलकर, सौरभ गांगुली, केदार जाधव यांनी करोनाशी लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानंर आता करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी युवराजसिंगनेही पुढाकार घेतला असून त्याने पंतप्रधान सहाय्यक निधीला 50 लाख रुपये दिले आहेत.
दरम्यान, पाकिस्तानमधील अल्पसंख्य हिंदूंना त्यांच्या शाहीद आफ्रिदीने केलेल्या मदतीचे कौतुक केल्यामुळे युवराज सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. आता मात्र, त्याने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.