युवराज सिंह आणि किम शर्माचा फोटो व्हायरल

बॉलिवुड अभिनेत्री किम शर्मा ही भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याची गर्लफ्रेंड असल्याचे मानले जात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे हे दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत. विशेष, म्हणजे या फोटोत युवराज सिंहसोबत त्याची पत्नी हेजी कीच देखील आहे.

युवराज सिंह याने नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसह सर्व स्तरावरील क्रिकेट स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली आहे. या निवृत्तीनंतर त्याचे एक जंग्गी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमधील हा फोटो आहे. हा फोटो शेअर करताना त्याने “गुड व्हाइब्स ओन्ली’ अशी फोटो कॅप्शनही दिली आहे.

या फोटोत तिघांच्याही चेह-यांवर एक वेगळीच झळक दिसते. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी किमने हेजलच्या एका पोस्टवर कॉमेंट करत, “सुंदर जोडी, असेच आनंदी रहा’ असे म्हटले होते.

दरम्यान, एका दशकापूर्वी युवराज आणि किम यांच्या डेटिंगच्या चर्चा खूपच रंगत होत्या. त्यानंतर 2007मध्ये दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. पुढे युवराज सिंहने 2016मध्ये हेजी कीचसोबत तो विवाहबद्ध झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)