उस्मानाबाद : तुळजापुरात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंझुरडे यांना बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीनंतर पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला असून तुळजापुरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.
तुळजापूर येथील पोलीस उपनिरीक्षक गणेश जिंझुरडे यांनी रस्त्यावर गाड्या का लावल्या अशी विचारणा केली असता, शिवसेना युवा तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केली असून पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंझुरडे यांच्या छातीवर, हातावर तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मारहाण करणाऱ्या आणि अन्य दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.सध्या तुळजापुरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंझुरडे यांनी, क्षुल्लक कारणावरून गलिच्छ शिवीगाळ केल्याने काही संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली असल्याचे युवा सेना कार्यकर्त्यांनी म्हंटले आहे. झालेला प्रकार चुकीचा असला तरी शिवीगाळ करणे कितपत योग्य आहे ? असा सवाल युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.