भाजपचा मुंबई पोलिसांवर इतका राग का?

युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई विचारला भाजपला सवाल

मुंबई : पोलिसांला मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडवण्यासाठी भाजपच्या एका बड्या नेत्याची धडपड सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी या आरोपींच्या सुटकेसाठी पोलिसांनाच फोन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  राम कदम यांनी आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसांना फोन करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आज युवासेनेने मुंबईत आंदोलन करण्याची तयारी केली आहे. युवासेना मुंबईतील विविध ठिकाणी दुपारी अडीच वाजता आंदोलन करणार आहे.

यातच या प्रकरणात युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी ट्विट करत भाजप पक्षावर खोचक टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, “मुंबई पोलिसांना आधी शिव्या आणि आता तर भाजप कार्यकर्त्यांचा पोलिसांवर थेट हल्ला ?!? भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का? ह्या घटनेचा निषेध करावा तितका कमी. सगळ्या आरोपींना अशी कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणाची असली हिम्मत होता कामा नये!”असा सवाल युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी  ट्विट करत भाजप पक्षाला विचारलं आहे.

पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींच्या सुटकेसाठी राम कदमांची धडपड ;ऑडीओ क्लिप व्हायरल

दरम्यान, मुंबईतील पवई पोलीस स्टेशनचे कर्मचारी नितीन खैरमोडे यांना भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी अमानुष मारहाण केली. दिपू तिवारी, सचिन तिवारी आणि आयुषा राजभर अशी आरोपींची नावं आहे. या घटनेत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे यांना दुखापत झाली आहे. पोलिसांनी कारवाई करुन आरोपींना अटक केली. मात्र काही तासांच्या आत आमदार राम कदम यांनी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना फोन करुन आरोपींना सोडण्याची विनंती केली. ही बाब समजताच शिवसेनेने राम कदम यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. राम कदम यांच्या निषेधार्थ युवासेना आज मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करणार आहे.

पवई हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एक ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणारे भाजपचे कार्यकर्ते धडकले. यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभरला ताब्यात घेतले. रिक्षाने जात असताना आरोपींनी नितीन खैरमोडे यांना रिक्षातच मारहाण केली. शिवाय त्यांच्या तोंडावर आणि गालावर हातातील कडे मारल्याची घटना समोर आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.