पवार सासवडच्या सभेला का आले नाही?

पुरंदरचे युवासेना अध्यक्ष मंदार गिरमे यांचा सवाल

दिवे – पुरंदर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांना प्रचारसभा नाकारल्याने शरद पवार यांनी पुन्हा विजय आपलाच आहे हा जुना राग आळवला आहे. शेजारच्या भोर आणि हडपसर मतदारसंघात पवारांनी सभा दिली; परंतु, पुरंदरमध्ये मात्र, त्यांनी वेळ दिली नाही. त्यामुळे पवारांना मानणारा मतदार संजय जगताप यांच्या पाठीमागे उभे राहील का? असा सवाल पुरंदरवासीयांना पडला असल्याचे युवासेना पुरंदरचे अध्यक्ष मंदार गिरमे यांनी सांगितले.

पुरंदर-हवेली विधानसभा मतदारासंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ वाड्यावस्त्यांवर फिरत असताना गिरमे यांना अनेक मतदारांनी वरील सवाल उपस्थित करीत आम्ही संजय जगताप यांच्या पेक्षा राज्यमंत्री शिवतारे यांना साथ देणार असल्याचे सांगितल्याने यंदा शिवतारे हॅट्ट्रिक मारणारच, असा विश्‍वास गिरमे यांनी व्यक्‍त केला.

मंदार गिरमे म्हणाले की, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सासवडचे पालखीतळ मैदान शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या सभेला नाकारण्यात आले होते. त्यातच कोथळे येथील एका सभेत त्यावेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक टेकवडे यांच्यावर कॉंग्रेसच्या काही लोकांनी दादागिरी केली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार घरी आले असताना संजय जगताप मागच्या दाराने निघून गेले आणि पवारांचा अपमान केला, असे त्यावेळचे कॉंग्रेस कार्यकर्ते मंदार गिरमे हे जाहीर सभेतून सांगत असतात. कदाचित याच गोष्टींचा राग पवारांच्या मनात नसेल ना ? अशीही चर्चा होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)