चहलवर जातीयवादी टिप्पणी केल्याप्रकरणी युवराज सिंगला अटक अन् जामीन

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटर युवराज सिंगला अनुसूचित जातीबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी हरयाणा पोलिसांनी अटक केली होती. अटक केल्यानंतर काही काळात अंतरिम जामिनावर युवराजची सुटका करण्यात आली.

गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान युवराज सिंग क्रिकेटर रोहित शर्मासोबत इन्स्टाग्राम लाईव्हवर बोलत होता. त्यादरम्यान युवराजने यजुवेंद्र चहलसाठी एक आक्षेपार्ह शब्दचा वापर केला होता. ज्यानंतर युवराज सिंग विरोधात एससी/एसटी कायद्या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान युवराज सिंगच्या अटकेबाबतची माहिती पोलिसांनी गुप्त ठेवली होती. शनिवारी हरयाणाच्या हांसी पोलिसांनी युवराजला अटक केली होती. त्यानंतर युवराजला अटक केल्याची माहिती रविवारी रात्री उशीरा समोर आली. पोलिसांनी युवराजला हिसार स्थित पोलीस विभागातील जिओ मेसमध्ये बसवून प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारले. त्यानंतर हायकोर्टच्या आदेशानुसार युवराज सिंगची औपचारिक जामिनावर सुटका केली.

गेल्या वर्षी इन्स्टाग्रामवरील रोहित शर्माच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये युवराने युजवेंद्र चहल याला xxxx म्हणून संबोधले होते. हे लाईव्ह झाल्यानंतर सोशल मीडियावर युवराज सिंग विरोधात आवाज उठवला गेला. ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता.

या शब्दचा अयोग्य वापर झाल्यावर नेटकऱ्यांनी युवराजवर टीकास्त्र सोडले. या लाईव्ह दरम्यान रोहित सर्वजण निवांत आहेत असे म्हणाला. चहल, कुलदीपही ऑनलाईन आले आहेत. त्यावर मस्करीत चहलबद्दल बोलताना युवराजने आक्षेपार्ह शब्द उच्चारला. म्हणून रोहितनेही हसत हसत हा विषय सोडून दिला. पण त्यानंतर नेटकऱ्यांनी युवराज सिंगवर चांगलाच निशाणा साधला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.