जेजुरी भक्‍तनिवासात युवकाची आत्महत्या

जेजुरी – मार्तंड देवसंस्थानच्या मल्हार भक्तनिवासातील खोलीत एका युवकाने छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.10) सकाळच्या सुमारास उघडकीला आली. सतीश सुनील लभडे (वय 27, रा.येसगाव, ता. कोपरगाव, जि. नगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

शनिवारी (दि. 8) सकाळच्या सुमारास सतीश लभडे या युवकाने देवदर्शन करण्यासाठी आलो असल्याचे सांगत दोन दिवसांकरिता भक्तनिवासातील रूम घेतली. शनिवारी दिवसभर भक्तनिवासात निवास केला. मात्र, सोमवारी (दि.10) साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याची खोली आतून बंद असून कोणताच प्रतिसाद येत नसल्याने व संशय आल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. दरवाजा तोडून काढला पाहिले असता त्याने आत्महत्या केल्याची बाब उघड झाली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.