गराडे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील वीर-भिवडी जिल्हा परिषद गटातील भिवडी गणाचे शिवसेना (शिंदे गट) युवा शिवसेनेचे अध्यक्ष राहुल दत्तात्रय चव्हाण यांनी शिवसैनिकांसह बुधवारी (दि. 14) सुपे खुर्द येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी महेश चव्हाण, खंडू चव्हाण, आकाश चव्हाण, अक्षय चव्हाण, शुभम गोरगल, यश चव्हाण, संतोष चव्हाण, रणजित मस्कुटे, नितीन चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, बाबू चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी काँग्रेसचे हरिचंद्र कुंजीर, कैलास जगताप, कमलाकर जगताप, सुमीत जगताप, दीपक म्हेत्रे, तुषार जगताप, काळुराम जगताप, संजय क्षीरसागर, योगेश जगताप, विजय जगताप, वैभव समगीर, कपिल म्हेत्रे, हनुमंत जगताप, महेश जगताप आदी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाच्या विचारांनी प्रेरीत होऊन आणि आमदार संजय जगताप यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन पक्षप्रवेश करीत असून यापुढे आमदार संजय जगताप यांचे हात बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे राहुल चव्हाण यांनी सांगितले.