लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश) : एका 16 वर्षीय मुलीवर एका 20 वर्षीय तरूणाने तिच्या घरात घुसून बलात्कार केला. त्यावेळी या युवतीने मदतीसाठी आरडा ओरडा केल्याने तीचे नाक कापण्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात घडला. या आरोपीची ओळख पटली असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत पिडीता शेजाऱ्यांकडे मदत मागण्यासाठी गेली असता ही घटना उजेडात आली. या शेजाऱ्यांनीच तिला नजिकच्या रुग्णालयात दाखल केले. शारदानगरच्या भागातील आपल्या घरात ही युवती एकटी असताना आरोपीने हा प्रकार केला.
प्राथमिक माहितीनुसार या मुलीचे वडील मजूर असून ही मुलगी घरी एकटी रहात असे. दुपारी आरोपी चाकूचा धाक दाखवून घरात घुसला. त्याने घराला आत येताच कडी लावून घेतली. मुलीने आरडा ओरडा सुरू करताच त्याने तिच्यावर हल्ला केला. नंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तो घटना स्थळावरून पळून गेला. त्यानंतर सारे बळ एकवटून या पिडीतेने शेजाऱ्यांना उठवले. त्यांनी तिला रुग्णलयात दाखल केले. पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.