चंद्रपूर – राज्यात रोज नवनवीन अत्याचाराच्या घटना समोर येताना दिसून येत आहे. चंद्रपुरातून भलतीच घटना समोर आली आहे. येथील एका युवकाने परिसरातील एका कुत्रीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आले आहे. या किळसवाण्या प्रकारानंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
आतापर्यत राज्यात महिला सुरक्षीत नव्हत्या मात्र चंत्रपूरातील या घटनेनंतर मुके प्राणी सुद्धा सुरक्षीत नाहीत की काय असा प्रश्न या घटनेवरून निर्माण झाला आहे. येथील युवकाने एका भटक्या कुत्रीव अत्याचार केले असून ही घटना प्राणी मित्र संघटनेने समोर आणली आहे.
या प्रकरणी प्राणी मित्र संघटनेने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी युवकावर गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे. प्रकाश डाफ असे संशयीत आरोपीचे नाव आहे. शहरातील रामनगर पोलिस चाैकीत त्याच्यावर गुन्हा दाखल करून घेतला आहे.
आरोपी युवकाने शहरातील नागपूर मार्गावरील भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केला. हा किळसवाणा प्रकार सुरुवातीला येथील स्थानिकांना दिसून आला. त्यानंतर या स्थानिकांनी या प्रकाराची माहिती प्राणिमित्र संघटना प्यार फाउंडेशनला दिली.