सविंदणे : जांबुत येथे बिबटयाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पिंपरखेड ता. शिरूर येथे पहाटे 3.30 वा… अरुण ढोमे यांच्या शेतातील शेतमजुर संजय दुधावडे रा .मुळ गाव पळशी, ता. पारनेर हा तरुण लघुशंका करुण घरात जाताना बिबट्याने मागुन हल्ला केला.तरुण पटकन घरात पळाल्याने थोडक्यात बचावला. तरुणाच्या पायाला वाघाने चावा घेतला असून चांगलीच दुखापत केली आहे.
जांबुत येथील त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची नागरीकांकडून मागणी होत आहे. शिरूर तालुक्यात बिबटयाच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरीकांचे अस्तित्व धोक्यात येत असून सध्या शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या नागरीकांना बिबटयाचे दर्शन होत असून बिबट्याच्या हल्ल्यात जांबुत येथील एका बालकासह एका व्यक्तीला जीव गमवावा लागला असून जीवघेणे हल्ले सुरु आहे.
डिंभा, चासकमान धरणाच्या बारमाही पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊसशेती मोठया प्रमाणावर होत आहे. याचाच फायदा बिबटयांनी उचलला असून उस शेतीलाच आपले घर समजून जंगल सोडून ठाण मांडले आहे. मादी अनेक पिलांना जन्म देत असल्यामुळे बिबट्यांची संख्या खुप वाढली असून वन विभागाकडे कमी पिंजरे, अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे बंदोबस्त करणे कठिण होत आहे.
या नरभक्षक बिबट्याला मानवाच्या रक्ताची चटक लागल्याने तो दुसरी शिकार करत नाही किंवा दुसरे भक्ष्य करत नाही. करमाळा येथील तीन जणांचा जीव घेतलेल्या बिबटयाला जेरबंद करण्यास चंद्रकांत मंडलिक यांनी अहोरात्र मोलाचे सहकार्य करुन जेरबंद केले होते. वनविभागाने तत्परतेने मदत मागितल्यास दोन दिवसांत या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग राबवून बिबट्याला जेरबंद करण्यात लवकरच यश मिळवू.
-चंद्रकांत मंडलिक संचालक, राणाज रायफल क्लब, पुणे.