कॉलेजच्या वर्गात केले “हे’ कृत्य; व्हिडीओ व्हायरल

पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप; गुन्हा नोंद

हैदराबाद – कॉलेजच्या जीवनात शिक्षण घ्यायचे सोडून अनेकदा मुले-मुली नको त्या गोष्टींच्या आहारी जातात आणि नको त्या गोष्टी करुन बसतात. आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातील एका कॉलेजच्या मुलाने आपल्याच वर्गातल्या एका मुलीसोबत केलेल्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यासंदर्भात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.

गोदावरी जिल्ह्यातील राजामहेंद्रवरम येथील एका ज्युनियर कॉलेजमधील एका मुलाने कॉलेजच्या वर्गात त्याच वर्गातल्या मुलीशी लग्न केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कॉलेजच्या रिकाम्या वर्गखोलीत सदर युवक त्याच्या मैत्रिणीला मंगळसूत्र घालताना दिसत असून, त्याने तिला कुंकुमतिलक (सिंदूर) लावल्याचे दिसून येत आहे. या दोघांच्या मित्रांनी हा व्हिडीओ चित्रीत करुन सोशल मिडीयामध्ये पोस्ट केल्यानंतर, हस्ते-परहस्ते तो व्हायरल होत गेला आहे.

या दोघांच्या विवाहाला घरुन विरोध असल्याने, त्या दोघांनी अशा आक्रमक पद्धतीने विवाह केल्याचे समजते. आपल्या मुलीने घरी न सांगता, विरोध असलेल्या मुलाशी लग्न केल्याने मुलीच्या घरच्यांनी तिला घरी परत स्वीकारण्यास नकार दिला आहे.

विशेष म्हणजे, मुलगा 18 वर्षांचा तर मुलगी 17 वर्षांची असल्याने कायद्यानुसार हा बालविवाह ठरतो आहे. त्यामुळे या व्हायरल व्हिडीओवरुन पोलिसांनी या अतिउत्साही दाम्पत्याला शोधून काढून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोघांच्या घरच्यांचे समुपदेशन करण्याची नवी डोकेदुखी पोलिसांसमोर निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.