दापोडी – युवा सेनेच्या वतीने सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्त बांधवांकरिता जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली. सांगली व कोल्हापूरला यंदा पुराचा मोठा फटका बसला असून, येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
त्यासाठी सर्वस्तरातून मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला जात आहे. पिंपरी विधानसभा युवासेनेने पुढाकार घेत पूरग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली. युवासेना अधिकारी प्रतीक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, कामिनी मिश्रा, विद्या देसाई, सनी कड, ओंकार जगदाळे, अमित शिंदे, अजय पिल्ले, अजित बोराडे, रवी नगरकर, विकास गायकवाड, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.