पुणे : आज गणपती विसर्जना दरम्यान वृदेश्वर घाटाजवळ एक युवक बुडाल्याची घटना घडली आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे युवकास जीवदान मिळाले आहे.
वृदेश्वर घाटाजवळ आज सकाळी एक युवक बुडाल्याची घटना घडली. परंतु, अग्निशमन दलाचे जवान एकनाथ कुंभार, गणेश शिंदे आणि जीवरक्षक भास्कर सुर्वे, विकी खंडागळे, गणेश जाधव, मंगेश सुपेकर, चौगुले यांनी बुडणाऱ्या युवकास वाचविले. अग्निशमन दलाने सलग 3 दिवसात 1 महिला व 2 पुरुषांचे जीव वाचवले आहेत.