व्हॅलेंटाईन डे साठी तरुणाई सज्ज

गुलाब पुष्पांसह, चोकलेट्‌स, कार्डस, स्टॅचू आदींची रेलचेल

नगर  – तसं आपण एकमेकांना नेहमीच भेटतो पण आपल्या नकळत आपल्याला कोणीतरी आवडायला लागतं आपल्या नकळत आपण कुठे तरी त्या आवडत्या व्यक्तीकडे ओढले जायला लागतो .आपलं मन आपल्या कह्यात राहात नाही .गुंतता हृदय हे …अशी अगदी प्राथमिक अवस्था असते प्रेमाची ….

आपलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आलाय… रोज डे, चॉकलेट डे, प्रपोज डे, हग डे, किस डे या दिवसांनंतर येणारा व्हॅलेंटाइन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आठवडयातला शेवटचा दिवस शुक्रवारी दि. 14 साजरा होणार आहे. यासाठी बाजारात अगदी पहिल्या दिवसांपासूनच जय्यत तयारी सुरू होती.

निरनिराळया प्रकारचे चॉकलेट्‌स बाजारात उपलब्ध असून तोंड गोड करण्याबरोबर त्या आठवणी सुगंधी करण्याच्या निमित्ताने कित्येक प्रकारचे गुलाबही प्रेमी युगुलांच्या दिमतीला हजर होत आहेत अगदी सुगंधी फुलांपासून ते गुलाबाच्या पाकळ्यांवर आपल्या प्रियकर प्रेयसीचे नाव कोरून देणे इतपत तंत्रज्ञान ही उपलब्ध आहे.

नुसते चॉकलेट गुलाबांनी भागात नसल्याने आपल्या भावनांना शब्दरूप देण्यासाठी प्रेमाचा मजकूर अगदी थोडक्‍या शब्दात मांडणारी भेटकार्डही आपल्या भावनाशील मनाला भुरळ घालतील शब्दरूप आलेल्या भावनांना सुगंधांचे कोंदण देण्यासाठी निरनिराळी सुगंधी परफ्युम आणि अन्य भेटवस्तूंची सध्या बाजारात रेलचेल दिसते आहे. यंदा खऱ्या गुलाब फुलांची आवक घटल्याने फुलांच्या किमती दुपटीने वाढले आहेत तर नकली फुलांनी असली फुलांची कमतरता भरून काढली आहे.

भेटवस्तूंची रेलचेल
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने चॉकलेट्‌स – 35 ते 700 , ग्रीटिंग कार्डस – 80 ते 1700 रुपये , सॉफ्ट टॉइज – 80 ते 2000 , कपल स्टॅचू – 150 ते 2000, फोटो फ्रेम्स – 999 , मिरर फ्रेम 800 ते 1500 , परफ्युम – 300 ते 1500 , खलित्या सारखे पत्र 299 आणि कॉफी मग- 400 ते 900 रुपयांना उपलब्ध आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.