युवक कॉंग्रेस उर्मिला मातोंडकर यांच्या पाठिशी – सत्यजीत तांबे

मुंबई: पक्षांतर्गत असलेल्या राजकारणाला कंटाळून कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या उर्मिला मातोंडकर यांना महाराष्ट्र युवक कॉंग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. उर्मिला यांना पक्षात मिळालेली वागणूक निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून एक पोस्ट करत व्यक्त केली आहे. युवक कॉंग्रेस उर्मिला मातोंडकर यांच्या पाठिशी असल्याचेही तांबे यांनी जाहीर केले आहे.

सत्यजीत तांबे म्हणाले, कॉंग्रेसचे युवा नेतृत्व असलेल्या उर्मिला मातोंडकर या विचारधारेशी एकनिष्ठ असेलल्या व्यक्ती आहेत. थोड्या काळासाठीच आम्ही त्यांच्यासोबत काम केले मात्र, या काळात त्यांच्या वागण्या-बोलण्यातून त्यांच्या विचारातील स्पष्टता आम्हाला जाणवत होती. तसेच त्यांनी कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देताना आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. यातून त्यांची वैचारिक एकनिष्ठता प्रतित होते. राजकीय व्यक्ती नसल्याने त्यांना पक्षातील गटबाजी सहन झाली नाही आणि त्यांनी राजीनामा दिला, असे सांगताना तांबे यांनी देखील कॉंग्रेसमधील गटबाजीवर बोट ठेवले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर उर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेसचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना तक्रार करणारे पत्र लिहिले होते. या पत्रात निवडणुकीदरम्यान काम न करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात त्यांनी तक्रार केली होती. मात्र या कार्यकर्त्यांवर देवरा यांनी कोणतीही कारवाई कर केली नाहीच, उलट त्यांना पदे देण्यात आली, असे सांगत उर्मिला मातोंडकर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×