मुंबई – अभिनेत्री दिशा पटनीचा 28 वा वाढदिवस शनिवारी झाला , त्याचबरोबर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचाही कालच वाढदिवस झाला. दिशा आणि आदित्य यांच्या नावाची मागच्या वर्षभरात सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. दरम्यान दिशाने आदित्य यांच्या वाढदिवसाशी ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्याने आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा या दोघांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
Happiest b’day @AUThackeray stay the amazing you and keep shining 🤗❤️
— Disha Patani (@DishPatani) June 13, 2020
यातच आदित्य ठाकरे यांना दिशा पटनीने ट्विटच्या करून शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये तिने, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आदित्य ठाकरे. असाच चमकत राहा. दिशाने यासोबत स्माइली आणि हार्टवाला इमोजी सुद्धा ट्विट केला आहे. सोशल मीडियावर दिशाच्या या ट्विटनंतर आदित्य आणि दिशाच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
त्यानंतर आदित्य ठाकरेंनीही दिशाला शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद दिशा. तू त्या ठराविक लोकांपैकी आहेस ज्यांना मी जून रोजी वाढदिवसानिमित्त तुलासुद्धा शुभेच्छा असं म्हणू शकतो. अशीच चमकत राहा आणि प्रगती कर , म्हणत आदित्य ठाकरेंनी तिला शुभेच्छा दिल्या. आदित्य ठाकरे यांचं नाव अनेकदा दिशासोबत जोडलं गेलं आहे. हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र असून अनेकदा त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुलाखतींमध्येही अनेकदा या दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारले गेले आहेत.