तुम्हीच करा तुमची आहार परीक्षा…

तपासा आहाराबाबत तुम्ही स्वत: किती जागरुक आहात ते...

डॉ. सीमा निकम, आहारतज्ज्ञ, पुणे
तुमच्या दैनंदिन आहाराच्या सवयींविषयी तुम्ही किती जागरुक आहात, त्याची एक चाचणी आपण येथे घेत आहोत. प्रश्‍नावली नीट वाचा आणि मगच उत्तरे द्या आणि तपासा आहाराबाबत तुम्ही स्वत: किती जागरुक आहात ते…

1. तुम्ही नियमितपणे न्याहरी करता का?
अ. कधीच नाही
ब. कधीकधी
क. आठवड्यातून तीन वेळा
ड. दररोज

2. तुम्ही दिवसातून किती वेळी चहा/कॉफी पिता?
अ. आग्रह केला की प्रत्येक वेळी
ब. चार ते पाच वेळा
क. फक्त सकाळी-संध्याकाळी
ड. अजिबात नाही

3. न्याहरीसाठी काय खाता?
अ. बेकरीचे पदार्थ
ब. रात्रीच्या पदार्थांना फोडणी दिलेले पदार्थ
क. हॉटेलमधील पदार्थ
ड. घरचे ताजे पदार्थ

4. दिवसातून किती पाणी पिता?
अ. तहान लागली की लगेच
ब. दीड लिटर
क. पाणी जवळ असेल तरच
ड. तीन लिटर

5. रोज किमान एक तरी फळ खाता का?
अ. नाही
ब. उपवासाला फक्त
क. महिन्यातून दोन वेळा
ड. होय

6. महिन्यातून किती वेळा मांसाहार करता?
अ. आठवड्यातून तीन वेळा
ब. महिन्यात दोन वेळा
क. महिन्यात एकदाच
ड. अजिबात नाही

7. महिन्यात किती वेळा मद्यपान करता?
अ. 20 वेळा
ब. 10 वेळा
क. एकदाच
ड. अजिबात नाही

8. दिवसातून व्यायामासाठी किती वेळ देता?
अ. अजिबात नाही
ब. 10 ते 15 मिनिटे
क. 45 मिनिटे (आठवड्यातून तीनदा)
ड. रोज 45 मिनिटे

9. रात्रीचे भोजन किती वाजता करता?
अ. दहा नंतर
ब. नऊ ते दहाच्या दरम्यान
क. आठ ते नऊच्या दरम्यान
ड. आठच्या आधी

10. झोप किती तासांची घेता?
अ. अस्वस्थ झोप असते
ब. कधी पूर्ण होते, कधी अपुरीच राहते
क. चार ते पाच तास
ड. सहा ते आठ तास

गुणांकन असे आहे…
अ. एक गुण – तुमचे गुण लिहा…
ब. दोन गुण – तुमचे गुण लिहा…
क. तीन गुण – तुमचे गुण लिहा…
ड. चार गुण – तुमचे गुण लिहा…

अशी आहे तुमची प्रकृती…
1. 10 ते 20 गुण – आरोग्याकडे त्वरेने लक्ष देण्याची गरज आहे
2. 20 ते 30 गुण – काही गोष्टीत सुधारणा आवश्‍यक आहेत
3. 30 ते 40 गुण – उत्तम आरोग्य, सातत्य ठेवणे

धन्यवाद. आरोग्यदायी जीवनासाठी हार्दीक शुभेच्छा…

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.