लखनौ –आम आदमी पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभेसाठी आणखी 19 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने पहिल्या यादीत 150 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत. पक्षाने सर्व 403 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या यादीत त्यांनी फाजीलनगर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात हरिश्चंद्र यादव यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. बलामपूरमध्ये उदयचंद्र पासवान, रामपूर कारखाना मतदारसंघात कौशल किशोर मनी, भगवंतनगरमध्ये नवीनकुमार शर्मा हे त्यांचे अन्य प्रमुख उमेदवार आहेत. या पक्षाने राज्यात दरवर्षी दहा लाख लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे.