तुमच्या आजोबांनी चीनला भेट म्हणून दिली होते यूएनचे सभासदत्व – भाजप

नवी दिल्ली – चीनने काल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळांमध्ये पुन्हा एकदा आपल्या नकाराधिकाराचा वापर करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर यास संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यास खोडा घातला. यावरून देशातील राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ट्विट करत दुबळे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना घाबरतात, अशी टीका केली आहे. यावर आता भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. चीन आज संयुक्त राष्ट्राचा सभासद नसता जर तुमच्या आजोबानी चीनला सभासदत्व भेट म्हणून दिले नसते, अशी टीका भाजपने ट्विटरवरून केली आहे.

भाजपने म्हंटले कि, भारत अजूनही तुमच्या कुटुंबाद्वारे केलेल्या चुकांची शिक्षा भोगत आहे. तुम्ही या गोष्टीला लक्षात घ्या कि भारत दहशतवादविरोधातील लढाई जिंकत आहे. हे सर्व आता तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडून द्या, असेही त्यांनी काँग्रेसला सांगितले.

दरम्यान, दुबळे मोदी शी जिनपिंग यांना घाबरतात यामुळेच जेव्हा-जेव्हा चीन भारताच्या कुरापती काढतो तेव्हा-तेव्हा पंतप्रधानांच्या तोंडातून साधा एक शब्दही फुटत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.