बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच एक फेसबूक पोस्ट लिहून आपण नेमके कुठे आणि का गेलो आहोत यावरुन पडदा उचलला. पंकजा मुंडेंचा मुलगा शिक्षणासाठी बोस्टनला गेला असून, त्याला तिथे सोडण्यासाठीच पंकजा मुंडे गेल्यात.
विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिलीय. त्यांचा या फेसबुक पोस्टला काही उसतोड कामगारांनी त्यांचे अभिनंदन करत जळजळीत वास्तव समोर आणणाऱ्या काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कजाताई, आमचं फक्त एवढचं म्हणणं आहे की ऊसतोड मजुरांच्या नेत्या या नात्याने ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजुरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का? तेही जरा पाहा. लक्ष्मण खेडकर यांचा फेसबुक पोस्टवर पंकजा यांनी देखील सविस्तर उत्तर दिलं.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे
‘जरूर लक्ष्मण मी ते करेन … आम्ही पहिल्यांदा अमेरीका इथे आलो ते ही ऊस तोडणारी विमल (तेव्हा ते ऊसतोड कामगार होते) आणि तश्याच लढण्यास तयार राहून यश मिळवणार्या सख्या घेऊन… आता त्या योजनेचे चित्र बदलले असावे मी incharge नाही राहिले .. प्रत्येकाची लढाई भिन्न असते कोणाची जगण्याची आणि कोणाची जगवण्याची .. मी अनेक ऊसतोड मजुरांना त्यांच्या मुलाच्या शिक्षण घेण्यासाठी मदत करत होते, करते आणि करत राहणार.. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मधून गरजूंच्या शिक्षणाला मदत,आपत्ती ग्रस्त संसाराला मदत, रुग्णांच्या ईलाज साठी मदत, covid 19 मध्ये covid centre, पूर ग्रस्त लोकांसाठी मदत फेरी, हे सर्व वंचित आणि शोषित यांच्या साठी करणे म्हणजे जगणे आहे..आणि कष्ट आणि मेरिट यांची सांगड घातल्या शिवाय काहीही नाही होऊ शकत..’