राजगुरू नगरमध्ये तरुणाची भोसकून हत्या

पुणे, (प्रतिनिधी): खेड तालुक्यातील एसईझेड मध्ये आज दुपारच्या सुमारास धारदार हत्याराने वार करुन तरुणाची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

नवनाथ झोडगे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. कंपन्यांमधील ठेकेदारीतून ही हत्या झाल्याचा संशय आहे. राजगुरुनगर पासुन काही अंतरावर खेड सिटी (सेझ)मध्ये मोठ्या प्रमाणात देशविदेशी कंपन्यांचा विस्तार वाढला आहे. त्यातून या परिसरात ठेकेदारीचे मोठं प्रस्त वाढत असताना येथे गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे.

नवनाथ हा तरुण सेझमधील एका कंपनीत सुपरवाझर म्हणुन काम करत होता. मात्र दुपारच्या सुमारास नवनाथवर काही तरुणांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. आरोपींच्या शोधासाठी राजगुरुनगर पोलिसांची पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके रवाना झाली आहेत.मयत झोडगे यांचा मृतदेह चांडोली ता. खेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.