विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या संशयातून युवकाचा खून

महाळुंगे इंगळे – विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या संशयातून बेदम मारहाण करण्यात आलेल्या युवकाचा दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. चाकण पोलिसांनी सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आकाश बाबुराव शेलार (वय 20, रा. अमृतनगर, मेदनकरवाडी) असे या घटनेत खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

आकाश याचे वडील बाबुराव शेलार यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अमित उर्फ अण्णा बजरंग माने, पद्माकर चितलेवाड, संदीप किसन कुसाळकर, गणपत लोहार, आकाश दौंडकर, सागर विटकर व सोन्या तामळगे (सर्व रा. मेदनकरवाडी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

एका विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या संशयातून आकाशला 4 ऑगस्टला रात्री चिडलेल्या या सात जणांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. आकाशला उपचारासाठी सुरुवातीला येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये व त्यानंतर मॅक्‍सन्युरो हॉस्पिटल आणि तद्‌नंतर पुण्याच्या रुबी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र गेली आठ दिवस मुत्युशी कडवी झुंज देताना रविवारी (दि. 11) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. *

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×