रायगड : रविवारी रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. रायगडाच्या पायऱ्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्याचे व्हिडिओदेखील समोर आले होते. यादरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील एक तरुण मित्रांसह टकमक टोकाच्या खाली कोसळणाऱ्या धबधब्यावर पोहण्यासाठी गेला होता. यादरम्यान त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मनोज खोपकर असे त्या वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
4 दिवसांनी सापडला मृतदेह
रविवारी दुपारनंतर किल्ले रायगड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पर्यटक रायगडावर गेले असतानाच मुख्य पायऱ्यांवरील काही भागात मोठ-मोठे धबधब्यांसारखे पाण्याचे लोंढे वाहू लागले. याच दरम्यान, रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील मनोज खोपकर हा आपल्या मित्रांसह टकमक टोकाच्या खाली कोसळणाऱ्या धबधब्यावर पोहण्यासाठी गेला होता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला.
तो मुंबईहून आपल्या मित्रांसह गावी आला होता. एनडीआरएफच्या पथकाकडून मनोज खोपकरचा शोध सुरु होता. चार दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर 4 दिवस सुरु असलेली शोधमोहीम थांबवण्यात आली. मनोज खोपकरचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.