धबधब्यावर पाय घसरून तरुणाचा मृत्यू

राजगुरूनगर – भोरगड (भोरगिरी, ता. खेड) येथे धबधबे पाहण्यासाठी गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा धबधब्यावर पाय घसरून पाण्यात पडून बुडून मुत्यू झाला.

सोमीनाथ विठ्ठल तांगडे (रा. राजगुरूनगर, मुळ गाव वडदतांगडा ता. भोकरदन, जि. जालना) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजगुरूनगर येथे एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून सोमीनाथ तांगडे काम करत होता. मंगळवारी (दि. 17) हॉटेल मालकाला सुट्टी सांगून भोरगिरी येथे धबधबे पाहण्यासाठी व देवदर्शनासाठी त्याचा मित्र प्रदीप सुभाष पावरा (वय 20) बरोबर गेला होता. त्यावेळी पावरा हा भोरगड गडावर शिवलिंगाचे दर्शन करण्यासाठी डोंगरावर गेला होता. तर तांगडे दुपारी दोनच्या सुमारास धबधब्याजवळ बसलेला होता. त्याचा मित्र परत खाली येत असताना सोमीनाथ धबधब्याच्या पाण्यात पडल्याचे लक्षात आले. सोमीनाथला पोहता येत नव्हते प्रदीपने तात्काळ हॉटेल मालकाला फोनद्वारे ही माहिती कळवली. तर बुधवारी (दि. 18) सकाळी खेड पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार देण्यात आली.

खेड पोलीस घटनास्थळी ग्रामस्थांना बरोबर घेऊन दाखल झाले. त्यानंतर धबधब्याच्या पाण्याच्या डोहात पाण्यात लोखंडी पंजा, गळ दोरी बांबूच्या साह्याने धबधब्याच्या पाण्यात सोमीनाथचा शोध घेतला असता मृतदेह सापडला. याबाबत खेड पोलीस ठाण्यात मयत सोमीनाथ यांचा मामा ज्ञानेश्‍वर पांडुरंग बोराटे (वय 45 रा शेलुद ता भोकरदन, जि. जालना) यांनी फिर्याद दिली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×