धक्कादायक ! बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची वारंवार धमकी; महिलेच्या छळाला कंटाळून युवकाची आत्महत्या

हिंगोली – महिलेच्या छळाला कंटाळून युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. नामदेव विठ्ठल पवार (वय 35, नरसी नामदेव, हिंगोली) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मयताची आई कांताबाई यांच्या तक्रारीवरून महिला आरोपी संगीता विरकर हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी संगीता विरकर मयत युवकास वारंवार धमक्या देऊन जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडत होती. तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, तुला बदनाम करेन, तुला तोंड काढायाला जागा ठेवणार नाही, अशी सतत धमकी देऊन मयताचा मानसिक छळ करत होती. या छळाला कंटाळून पवार यांनी आत्महत्या केली.

दरम्यान, एका बाजूला महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. सकाळी डोंबिवली मध्ये एका 15 वर्षीय मुलीवर तब्बल 29 जणांनी बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. या अगोदर साकीनाका, पुणे, पिंपरी-चिंचवड याठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. दर दुसरीकडे हिंगोलीत महिलांकडून अत्याचार होण्याची घटना समोर आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.