पुणे : अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी 22 वर्षीय तरूणाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे. संतोष बसगोंडा भेंडवडे (रा. शिक्रापुर, ता. शिरूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने ऍड. भालंचद्र पवार, ऍड. अक्षय रतनगिरी आणि ऍड. योगेश पवार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत शिक्रापुर पोलिसात फिर्याद दिली आहे. मंदिरात जाते, म्हणून गेलेली पीडित परत आलीच नाही. याबाबत 11 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला. तपासात संतोष याने तिला पळवून नेल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला.
तो निरापराध आहे. त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. त्याला या गुन्ह्यात अडकाविण्यात आले आहे. दाखल गुन्ह्यात मुलीसोबत शारीरिक संबंध झाल्याचे दिसून येत नाही. मुलगी स्वत:हून पळून गेली आहे. अशी मागणी त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. पुराव्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, परवानगीशिवाय देश सोडायचा नाही, सुनावणीस हजर राहणे या अटीवर न्यायालयाने त्यांना जमीन दिला.