पुणे – अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणातून विशेष न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी तरूणाची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. ती मुलगी स्वत:हून तरूणासोबत पळून गेली. त्याच्या नातेवाईकांच्या घरी राहिल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
अमित बाळासाहेब सुतार (रा. वढु बुद्रुक, ता. शिरूर) असे त्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ऍड. सुनीता बन्सल आणि ऍड. नितीश चोरबेले यांनी बाजू मांडली. 25 डिसेंबर 2016 रोजी तिला घरातून अनोळख्या व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. ती पोलिसांनी 6 जानेवारी 2017 रोजी मिळून आली.
तपासात त्याने लग्नाच्या अमिषाने पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. पुराव्यामध्ये ती 17 वर्षाची असून, पीडित आणि मुलगा याचे प्रेमसंबंध होते. ती स्वत:हून मुलाच्या गाडीवर पळून गेल्याचे निष्पन्न झाले. बचाव पक्षातर्फे ऍड. सुनीता बन्सल आणि नितीश चोरबेले यांनी काम पाहिले.