ब्रेकिंग : मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी तरुणाची आत्महत्या

बुलढाणा: सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वचजण प्रचार मग्न आहेत. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यांची जाहीर सभा बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा वरवट बकाल व खामगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभे पूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या सभेपूर्वी शेगाव तालुक्यातील खातखेड येथील राजू नामदेव तलवारे या युवकाने “पुन्हा आणूया आपले सरकार” हे टी-शर्ट घालून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदार संघातील ही घटना आहे.

त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील वरवट बकाल येथे थोड्याच वेळात वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.